सुनिल भाऊ यांना समाज सेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्काराचा कार्यक्रम

नमस्कार 🙏🏼
आज दि.०२/१२/२०१८ रविवार रोजी,सिडको बसस्टँण्ड समोर,हॉटेल लाडली येथे सकाळी १०ः००वाजता बडगुजर उत्कर्ष मंडळ, मुंबई व बडगुजर दर्शन तर्फे सुनिल भाऊ यांना समाज सेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल आपण "बडगुजर समाज मंडळातर्फे"सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता, कार्यक्रमाला सर्व बडगुजर समाज बांधवांनी उपस्थिती लावली,त्या बदल सर्वाचे आभार, कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्वांनी सुनील भाऊ आणि भावनाताई चे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार केला, श्री कैलाश शेठ (अध्यक्ष बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद) यांनी सुनील भाऊ बदल दोन शब्द व्यक्त केले, या वेळी सौ.भावनाताई सुनिल बडगुजर यांची सर्वानुमते महीला अध्यक्षा म्हणून फेरनिवड करण्यात आली असुन, तसेच श्री. अशोक मधुकर शेठ बडगुजर यांची उपसचिव, श्री संजय महादू शेठ बडगुजर यांची उपाधयक्षपदी, श्री रुपेश बडगुजर यांची संघटक म्हणून निवड करण्यात आली, चहा आणि नाष्टा करून कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रेस नोट - १५/०८/२०१८

नमस्कार,🙏🏻🙏🏻 आपल्या सर्व समाजबांधवांना कळवितांना अत्यंत आनंद होतो की दरवर्षा प्रमाणे आई चामुंडामातेच्या कृपेने या वर्षी ही बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद तर्फे गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा व सर्व साधारण सभेचे आयोजन बुधवार दि.१५ अॉगष्ट २०१८ रोजी, स. १०:०० ते दु. ३:०० वा. या वेळेत 'रामायणा कल्चरल हॉल' उल्कानगरी, औरंगाबाद येथे करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक श्री.जितेंद्र प्रल्हाद बडगुजर, जनरल मॅनेजर (एच.आर.) व्हेरॉक कार्पोरेट, एम.आय.डी.सी., वाळुज, औरंगाबाद हे होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. श्री. प्रमोद विठ्ठल पालष्टे एम. डी. (होमियोपॅथी), हे होते तर श्री.सुनिल सुरेश बडगुजर (सहायक पोलिस निरिक्षक ) दहशतवाद विरोधी पथक, औरंगाबाद, श्री.अर्जुन रंगराव बडगुजर, (सेवानिवृत्त शिक्षक), बहादरपुर,ता.पारोळा, श्री.अशोक रामदास बडगुजर, (सेवानिवृत्त अधिकारी ) पाटबंधारे विभाग, श्री.कैलास लक्ष्मण बडगुजर, अध्यक्ष बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद, सौ.भावनाताई सुनिल बडगुजर, महिला अध्यक्ष बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद, सौ.अल्काताई अशोक बडगुजर व डॉ.सौ.धनश्री राहुल बडगुजर ही मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व चामुंडामाता प्रतिमेचे पुजन करून झाली. या नंतर सर्व समाज बांधवांनी आप-आपला ओळख परिचय दिला.तर महिला मंडळींनी नागपंचमी सणानिमित्त मनोरंजक गीतावर व पुरूष मंडळींनी श्रावण मासाच्या गीतावर नृत्य सादर केले. क्षणभर विश्रांती नंतर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी व मान्यवरांचा पुष्पगुच्छ व शाल देवुन सत्कार करण्यात आला. या नंतर लहान मुले, महिला मंडळी व पुरूष मंडळीसाठी संगित खुर्चीचा मनोरंजक खेळ खेळण्यात आला. या कार्यक्रमाचा आनंद सर्व उपस्थित समाज बांधवांनी घेतला. ठरल्याप्रमाणे छोटया बालमित्रांना कलर पेन्सील बॉक्स उपस्थित अध्यक्ष व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या नंतर दहावी, बारावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत पाल्यांचा सत्कार शालेय उपयोगी स्कुल बॅग देवुन, तसेच आठवी, नववी उत्तीर्ण पाल्यांचा सत्कार पेपर पॅड देवुन करण्यात आला व संगित खुर्चीत प्रथम आलेल्यांचा ही सत्कार करण्यात आला .या प्रमाणे सत्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. जितेंद्र प्रल्हाद बडगुजर तसेच व्यासपीठावर उपस्थित मंडळी श्री.सुनिल सुरेश बडगुजर, श्री प्रमोद बडगुजर, श्री अर्जुन बडगुजर यांनी समाजबांधवां समोर आपले प्रेरणादाई विचार मांडलीत. तसेच श्री सुनिल रमेश बडगुजर,श्री. संजीव जाधव, श्री रूपेश बडगुजर, श्री. नरेंद्र बडगुजर व सौ छाया बडगुजर यांनी आपले व्यक्तीगत विचार मांडले.तर कैलास बडगुजर यांनी कार्यक्रमात आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. मोहिनी अमोल बडगुजर यांनी केले.या नंतर सर्व समाज बाधवांनी भोजनाचा अस्वाद घेत हितगुज साजले. कार्यक्रम व्यवस्थित संपन्न होण्याकरीता श्री.अशोक भिकाजी बडगुजर, श्री.चंद्रकांत खंडु बडगुजर, श्री.हर्षल सुरेश बडगुजर, श्री नरेंद्र बडगुजर, श्री.जितेंद्र भास्कर बडगुजर,तसेच सौ.भावनाताई बडगुजर, सौ.सिमाताई बडगुजर, सौ.मोहिनीताई बडगुजर, सौ.सोनालीताई जाधव यांचे अनमोल मोलाचे सहकार्य लाभले. सर्व समाज बांधव कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे ही सहकार्य लाभले. त्यासाठी समाज बांधवांचे ही आभार, असेच सहकार्य बडगुजर समाज मंडळ, औरंगाबादला आई चामुंडामातेच्या कृपेने मिळत राहील. धन्यवाद...!

आपले विनित
सर्व कार्यकारिणी मंडळ
बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद.

अखिल भारतीय बडगुजर महासमिती व औरंगाबाद बडगुजर समाज मंडळ बैठक

प्रेस नोट

आपले विनित
सर्व कार्यकारिणी मंडळ
बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद.

दिनांक:-16.08.2017

सर्व समाज बांधवांना कळविण्यास आनंद होत आहे की, दि.15 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 02.30 वाजेपर्यंत बडगुजर समाज मंडळ,औरंगाबाद ची वार्षिक सर्वसाधारण सभा, गुणवंत पाल्यांचा सत्कार व महिलांचा मंगळागौर कार्यक्रम व श्री. छगन लटकनशेठ बडगुजर व सौ. दुर्गाबाई छगनसेठ बडगुजर यांचा जीवन गौरव सत्कार समारंभ व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

स्थळ – राधा कृष्ण मंगल कार्यालय, गजानन महाराज रोड, गारखेडा परीसर, औरंगाबाद.

या वेळी कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर प्रमुख अतिथी श्री.प्रतापराव वामनराव बाविस्कर (उप विभागीय पोलीस अधिकारी, डी.वाय.एस.पी. औरंगाबाद. ),कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री.सुनील सुरेश बडगुजर (सहायक पोलीस निरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, औरंगाबाद ) यांनी वेळात वेळ काढून उपस्थीती दिली.

आपले विनित
सर्व कार्यकारिणी मंडळ
बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद.

२६ जानेवारी २०१७,गुरूवार

बडगुजर समाज, औरंगाबाद.

आपणास सर्वांस कळवितांना आनंद होतो की आई चॉमुंडा मातेच्या क्रूपेने दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही बडगुजर समाज औरंगाबाद तर्फे श्री क्षेत्र दाक्षायणी मंदीर लासुरगाव,ता.वैजापुर,जि औरंगाबाद येथे सहल, हुरडा पार्टी स्नेह भोजन व हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सर्व समाजबांधवांनी सहभाग घेतला व उत्तम प्रतिसाथ दिला.
नियोजीत वेळेनुसार बस हर्सुल टी पॉइंट वरून ७:३० वा निघाली औरंगाबाद शहरातील सर्व समाज बांधवांना घेऊन बजाजनगरला ९:३० वा पोहचली.श्री संजयशेट बडगुजर यांनी सर्व समाजबांधवांसाठी नास्तापाणीचे आयोजन केले.
जेष्ठ समाज बांधव श्री सुरेशशेट बडगुजर यांनी नारळ फोडून बस प्रवासाला सुरवात केली.प्रवास फिल्मी गाणी अंताक्षरी व मनोरंज गप्पांणी झाला.श्री क्षेत्र दाक्षायणी माता मंदीराला ११:३० वा.पोहचली.सर्वानी आनंदाने दर्शन घेतले व हुरडा पार्टीसाठी श्री कुलकर्णी यांचे फार्म वर पोहचले.
हितगुज गप्पांणी हुरडा पार्टीला सुरूवात झाली. लहान थोर मंडळींसाठी ही खास सोय केली होती. झाडांवर दोरीचा झोका, हॉली बॉल, बॉटमॅंटन व इतर खेळ. लहान थोरांनी सहभाग नोंदविला.त्यानंतर डब्बा पार्टीस( जेवणास) सुरूवात झाली व सर्वानी आणलेले वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखावयास मिळाली.
सर्व समाजभगिणींचा हळदी कुंकूवाचा कार्यक्रम पार पडला. बडगुजर समाज अध्यक्ष श्री कैलासशेट बडगुजर यांनी आपले विचार व मार्गदर्शन केले.नविन सहभागी मंडळींनी आपआपला ओळख परिचय दिला.श्री गजाननशेट बडगुजर यांनी आभार प्रकट केले व परतीच्या प्रवासाला निघाले.
या पध्दतीने २६ जानेवारी २०१७ चा बडगुजर समाज औरंगाबादचा कार्यक्रम पार पडला.सर्व समाज बांधव व भगिणींचे सहकार्य लाभले व लाभत राहील.

"जय चॉमुंडा माता"

धन्यवाद.!.....

16.08.2016 ची वार्षिक सर्वसाधारण सभा

दिनांक:-16.08.2016 सर्व समाज बांधवांना कळविण्यास आनंद होत आहे की, दि.15 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत बडगुजर समाज मंडळ,औरंगाबाद ची वार्षिक सर्वसाधारण सभा, गुणवंत पाल्यांचा सत्कार व कु.पुनम राजु बडगुजर हिचा सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
स्थळ - यशवंत कला महाविद्यालय सभागृह, माणिक हॉस्पिटल जवळ, जवाहर कॉलनी, गारखेडा परीसर, औरंगाबाद.

या वेळी कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर प्रमुख अतिथी श्री.अशोक तांबटकर (प्राचार्य,यशवंत कला महाविद्यालय,औरंगाबाद. ), श्री.ईश्वर हरिचंद्र बडगुजर (संपादक, बडगुजर समाजदूत ),श्री.प्रकाश धुडकू बडगुजर (सहसंपादक,बडगुजर समाजदूत), श्री.मुकेश बडगुजर (सचिव,बडगुजर सरस्वती मिशन, पाचोरा ), चि.गौरव बडगुजर (बडगुजर सरस्वती मिशन,नासिक),चि.निरंजन बडगुजर (बडगुजर सरस्वती मिशन,धरणगाव ), चि.अमित बडगुजर (दिग्दर्शक,चामुण्डामाता भक्तीगीत, फागणे ) यांनी वेळात वेळ काढून उपस्थीती दिली.

|| सुस्वागतम् ||

ही वेबसाईट औरंगाबाद जिल्ह्यातील बडगुजर समाजाने आपापसातील संवाद वाढून सर्वांची एकत्रित प्रगती व्हावी यासाठी तयार केलेली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील बडगुजर समाजाची ऑनलाइन समाज दर्शन पुस्तिका हे या वेबसाईटचे वैशिष्ट्य आहे. याचबरोबर या वेबसाईट वर विविध ठिकाणचे समाज वृत्त देखील प्रकाशित केले जातात. औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे. येथे देश-विदेशातील लाखो पर्यटक भेट देत असतात. बडगुजर समाज बांधवांसाठी येथील पर्यटन सोयीस्कर व्हावे याकरिता 'माहिती केंद्र' या मथळ्याखाली जिल्ह्यातील पर्याटनासंदभाची माहिती ‘औरंगाबाद विषयी माहिती’ येथे देण्यात आलेली आहे. त्याच बरोबर आरोग्यासाठी विविध टिप्स ‘आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी’ मध्ये आणि विद्यार्थ्यांसाठी करिअरचे विविध पर्यायांची माहिती 'मुलांसाठी करिअर चे पर्याय' मध्ये माहिती देण्यात आलेली आहे.

औरंगाबाद समाज मंडळाने आजपर्यंत राबविलेले विविध उपक्रम आणि मंडळाची कार्यकारिणी वेबसाईट वर दिलेली आहे. आपणास वेबसाईट विषयी काही अभिप्राय द्यायचा असल्यास किंवा काही दुरुस्ती सुचवायची असल्यास 'संपर्क साधा' या पेज वर आपण अपलोड करू शकता किंवा तेथे दिलेल्या वेब टीमला फोन करून त्या विषयी कळवू शकता.

वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल आभारी आहोत!
वेब टीम, बडगुजर समाज मंडळ,
औरंगाबाद
info@badgujaraurangabad.com

बडगुजर समाजाचा इतिहास

बडगुजर समाज हा प्राचीन सूर्यवंशी राजपूत वसाहतीतला एक मानला जातो. बडगुजर समाज हा प्राचीन भारतातील सर्वात सन्मानित राजपूत समाज आहे. ते प्रत्येक युद्धात आक्रमणाची पहिली पंक्ती स्थापन करत. बडगुजर समाज त्यांच्या शौर्या साठी ओळखले जातात. बडगुजर समाजाचे कुलदैवत श्री चामुंडा माता असून ते गुजरात मधील सुरेंद्र नगर जिल्ह्यातील चोटीला हिल्स वर स्थित आहे. श्री चामुंडा माता हे शक्तीच्या ६४ च्या अवतारांपैकी एक अवतार आहे.

बडगुजर समाजाची सुरवात शेकडो वर्षांपूर्वी गुजरात मधून झाली, नंतर नोकरी व्यवसायाच्या अनुशंघाने ते देशात इतरस्त्र पसरले. पूर्वी त्यांच्या सुत कातण्याचा (सुत लोढणे) चा व्यवसाय करत. म्हणून त्यांना “लोढारी” असेही संबोधिले जाते.

आज ह्या समाजातील व्यक्ती शेती पासून व्यापार पर्यंत, पारंपारिक व्यवासायांपासून विविध क्षेत्रातील उच्च पदावर कार्यरत आहेत. आज समाजातील तरुण पिढी शिक्षण संदर्भात जागृत असून त्यांची गुणवत्ता सिद्ध करत आहेत.

औरंगाबाद शहर मध्ये बडगुजर समाज ९० च्या दशकात वाढू लागला, यात प्रामुख्याने धुळे, जळगाव, नाशिक तसेच अमरावती हून येणारी विविध समाज बांधव होते. ह्या बांधवांना एकत्र करण्याच्या उद्देशाने ५ फेब्रुवारी १९९३ साली श्रीनिकेत कॉलोनी येथे श्री. कैलाश लक्ष्मण बडगुजर यांच्या घरी बैठक झाली व त्यातूनच औरंगाबाद बडगुजर समाज मंडळाची स्थापना झाली.

श्री. कैलाश लक्ष्मण बडगुजर हे मंडळाचे पहिले संस्थापक/अध्यक्ष आहेत. त्या काळी फोन तसेच वाहतुकीच्या जास्त सुविधा नसल्या मुळे त्याकाळी घरो घरी सायकली वर जाऊन पत्रव्यवहार करून समाजाला एकत्र ठेवण्याचे काम केले जात असे.

“कल्पतरू क्रेडीट सोसायटी” व “श्री चामुंडा माता क्रेडीट सोसायटी” ह्या दोन संस्थाची स्थापना गरजू समाज बांधवांच्या मदतीसाठी स्थापन करण्यात आल्या. ह्या संस्थेच्या मार्फत अनेक बांधवांना मदत करण्यात आलेली आहे.

गेल्या २२ वर्षांमध्ये मंडळाच्या सहाय्याने विविध एकोपा जपण्याचे कार्यक्रम अवितरत पणे केले जात आहे. ह्यात प्रामुख्याने १५ ऑगस्ट व २६ जानेवारी च्या दिवशी विविध कार्यक्रम केले जातात. ह्या उपक्रमांमध्ये सर्व महिला व पुरुष वर्गाना समान संधी दिली जाते. मंडळाचे सदस्य ह्या दिवसांची आतुरतेने वाट बघत असतात.

मागील १० वर्षांपासून दरवर्षी २६ जानेवारी ला औरंगाबाद समाज बंधू भगिनींसाठी कौटुंबिक सहलीचे आयोजन केले जाते. सहलीची सुरुवात प्रथम वर्षी देवगड, शनिशिंगणापूर आणि सोनई माता येथून करण्यात आली. त्यानंतर शेगाव, H2O वॉटर पार्क दौलताबाद, पैठण, शुलीभंजन, राजूर, आणि मोहटादेवी य ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात आले. असाच कार्यक्रम या नंतर ही चालू ठेवण्याचा निर्धार समस्त बडगुजर परिवार, औरंगाबाद यांनी केला आहे.

ह्याच उपक्रमाचा भाग म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करीत वेबसाईट बनवण्यात आलेली आहे. वेबसाईट द्व्यारे औरंगाबाद मधील समाज बांधवांची एकत्रित माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ह्याच बरोबर औरंगाबाद शहराची माहिती, करिअर निगडीत व इतर माहिती प्रकाशित करण्यात येते.

News/Notifications

 • दि. 22.09.19-बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद तर्फे "गुणवंत पाल्यांचा सत्कार आणि समाज मीटिंगचे आयोजन" करण्यात आले आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.; कार्यक्रमाचा दिनांक: 22.09.19 रविवार; कार्यक्रमाची वेळ: सकाळी १०:३० ते दुपारी 3.00; कार्यक्रमाचे ठिकाण:मराठवाडा स्मॉल स्कले इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर हॉल (मासिहा), कॉसमॉस बँक,मोरे चौक, बजाजनगर, MIDC वाळूज, औरंगाबाद.; कार्यक्रमाची रूपरेषा: सकाळी १०:३० - दीपप्रज्वलन व चामुंडा माता प्रतिमेचे पूजन, सकाळी १०:३५ -बडगुजर समाज व सोशल मीडिया या विषयावर वकृत्व स्पर्धा १२:०० - प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे स्वागत आणि मनोगत; दुपारी १२:३० -गुणवंत पाल्यांचा सत्कार, अॅड.श्री प्रवीण पंडित चव्हाण,विशेष सरकारी वकील व कार्यकर्त्या भगिनीचा सत्कार, दुपारी १:३० - स्नेहभोजन.
 • *१० वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थांचे व त्याच्या पालकांचे खूप खूप अभिनंदन व त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस सर्वाना खुप खुप शुभेच्छा...!!* *श्री राकेश अरविंद कोतवाल व सौ सिमाताई राकेश कोतवाल यांची कन्या .ऋग्वेदी हिला इ.१० वी शालांत परिक्षेत ८९% गुण मिळवुन उत्तीर्ण झाल्याबद्दल फार फार अभिनंदन ..!*💐👌🏻👏🏻👏🏻*श्री सुनिल पंडित बडगुजर व सौ स्मिता सुनिल बडगुजर यांचा चि.दर्शन यास इ.१० वी शालांत परिक्षेत ९८% गुण मिळवुन उत्तीर्ण झाल्याबद्दल फार फार अभिनंदन. चि.कृण्षा याचे व संपुर्ण साळुंखे परिवाराचे अभिनंदन. बडगुजर समाज मंडळ औरंगाबाद,
 • सर्व समाज बांधवांना कळविण्यास आनंद होत आहे की, दि.15 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 02.30 वाजेपर्यंत बडगुजर समाज मंडळ,औरंगाबाद ची वार्षिक सर्वसाधारण सभा, गुणवंत पाल्यांचा सत्कार व महिलांचा मंगळागौर कार्यक्रम व श्री. छगन लटकनशेठ बडगुजर व सौ.दुर्गाबाई छगनशेठ बडगुजर यांचा जीवन गौरव सत्कार समारंभ व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्थळ – राधा कृष्ण मंगल कार्यालय, गजानन महाराज रोड, गारखेडा परीसर, औरंगाबाद. या वेळी कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर प्रमुख अतिथी श्री.प्रतापराव वामनराव बाविस्कर (उप विभागीय पोलीस अधिकारी, डी.वाय.एस.पी. औरंगाबाद. ),कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री.सुनील सुरेश बडगुजर (सहायक पोलीस निरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, औरंगाबाद ) यांनी वेळात वेळ काढून उपस्थीती दिली. आपले विनित सर्व कार्यकारिणी मंडळ बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद.

 • More details
 • https://incometaxindiaefiling.gov.in/e-Filing/Services/LinkAadhaarHome.html ज्या समाजबांधवांचे आधार आणि पॅन लिंक करायचं राहून गेले आहे त्यांनी ह्या लिंक वर जाऊन आधार आणि पण लिंक करून घेणे. कायद्याने ते बंधनकारक आहे.
 • 17.09.2016 मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनाच्या मना पासून हार्दीक शुभेच्छा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
 • 05.08.2016, सर्व समाज बांधवांना कळविण्यास आनंद होत आहे की, दि.15 आॅगष्ट 2016 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत बडगुजर समाज मंडळ,औरंगाबाद ची वार्षिक सर्वसाधारण सभा, गुणवंत पाल्यांचा सत्कार व कु.पुनम राजु बडगुजर हिचा सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. स्थळ - यशवंत कला महाविद्यालय सभागृह, माणिक हॉस्पिटल जवळ, जवाहर कॉलनी, गारखेडा परीसर, औरंगाबाद सर्व समाज बांधवांना कार्यक्रम पत्रिका घरपोच लवकरच पाठविण्यात येणार आहे. आपले विनित सर्व कार्यकारिणी मंडळ बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद
 • चलो धुळे चलो धुळे चलो धुळे त्रिराज्यातारीया बडगुजर समाज विवाह इच्छुक युवक-युवती परिचय महामेळावा. दि.२४.०१.२०१६ रविवार धुळे येथे आयोजित करण्यात आला आहे. स्तल:- ओ.के.गीडोदीय हायस्कूल, रचना हॉल, पारोळा रोड, धुळे. तिथी:- रविवार २४.०१.२०१६.
  More details

 • More details

 • More details
 • 29.09.2015 दि. १५ ऑगस्ट २०१५ - बडगुजर समाज मंडळ औरंगाबाद तर्फे ” "गुणवंत पाल्यांचा सत्कार आणि समाज मीटिंगचे आयोजन चा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजनाचे ठिकाण हे जागृत हनुमान मंदिर सभागृह, मोहटा देवी मंदिर रोड, मोरे चौकाजवळ, बजाजनगर, MIDC वाळूज, औरंगाबाद करण्यात आले होते. कार्यक्रमाचा दिनांक: १५ ऑगस्ट २०१५ शनिवार; कार्यक्रमाची वेळ: सकाळी १०:३० ते दुपारी २:३०. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक मा.श्री. भगवान लक्ष्मण बडगुजर (अध्यक्ष बडगुजर समाज मंडळ, नवी मुंबई व कोकण परिसर) कार्यक्रमाचे प्रमुक पाहुणे मा.श्री.आनंदा धोंडू सूर्यवंशी (उपाधाक्ष्य अखिल भारतीय बडगुजर महासमिती) श्री.माधवराव जानिकाराम बडगुजर (सदस्य अखिल भारतीय बडगुजर महासमिती) सो.पुष्पाताई वसंतराव बडगुजर (सदस्य अखिल भारतीय बडगुजर महासमिती) श्री.अशोक सीताराम बडगुजर (अध्यक्ष बडगुजर समाज , धुळे ) श्री.भगवान डोंगर बडगुजर (कोश्धाक्ष्य बडगुजर समाज मंडळ, नवी मुंबई व कोकण परिसर ) श्री.अनिल चोरडिया (जिल्हा परिषद सदस्य , भाजप उपाधाक्ष्य बजाज नगर , औरंगाबाद.)हे होते. प्रथम प्रमुंख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते चामुंडा मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रमुक पाहुणे व मान्यवराचे उपस्थितआचे स्वागत व मनोगत व्यक्त करण्यात आले. त्या नंतर हसा आणि हसवा या मनोरंजनात्मक कार्यक्रम श्री. धनंजय जाधव यानी घेतला. त्या सोबत नवीन कुटुंबांचा परिचय करून देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुक पाहुणे यांचा हस्ते गुणवत पाल्यांचात सत्कार करण्यात आला. त्या नंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला . या कार्यक्रमा साठी बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद यांचा तर्फे अहोरात्र परिश्रम श्री. कैलाश लक्षुमन बडगुजर (अध्यक्ष), श्री. सुनील पंडित बडगुजर (उपाधाक्ष्य), श्री.सुनील रमेश बडगुजर , श्री.रवींद्र हिरालाल बडगुजर (कोशाधाक्ष्य ), श्री अशोक भिका बडगुजर (सहकोशाधाक्ष्य), श्री अशोक मधुकर बडगुजर (संघटक ), श्री गजानन दतात्रेय बडगुजर (संघटक ) , श्री.संजीव जगन्नाथ जाधव, श्री.शैलेश रामकृष्ण बडगुजर, श्री.संजय सोनू बडगुजर, ची.सुरज कैलाश बडगुजर, सौ.भावनाताई सुनील (महिला अध्यक्ष), सौ.नाम्राताई संजय बडगुजर (महिला सदस्य). वेब टीम.:-श्री.धनंजय पांडुरंग जाधव , श्री.हर्शल सुरेश बडगुजर , श्री.मुकेश प्रकाश महाले.

 • More details
 • दि. ०९ ऑगस्ट २०१५ - बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद तर्फे "गुणवंत पाल्यांचा सत्कार आणि समाज मीटिंगचे आयोजन" करण्यात आले आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.; कार्यक्रमाचा दिनांक: १५ ऑगस्ट २०१५, शनिवार; कार्यक्रमाची वेळ: सकाळी १०:३० ते दुपारी २:३०; कार्यक्रमाचे ठिकाण: जागृत हनुमान मंदिर सभागृह, मोहटा देवी मंदिर रोड, मोरे चौकाजवळ, बजाजनगर, MIDC वाळूज, औरंगाबाद.; कार्यक्रमाची रूपरेषा: सकाळी १०:३० - दीपप्रज्वलन; सकाळी १०:४५ - हसा आणि हसवा मनोरंजनात्मक कार्यक्रम; दुपारी १२:०० - प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे स्वागत आणि मनोगत; दुपारी १२:४५ - नवीन कुटुंबांचा परिचय; दुपारी १:०० - गुणवंत पाल्यांचा सत्कार; दुपारी १:३० - स्नेहभोजन.
  More details
 • दि.२७.०७.२०१५ माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना औरंगाबाद बडगुजर समाज तर्फे भावपूर्वक आदरांजली २७.०७.२०१५.
 • दि. २५.०७.२०१५: औरंगाबाद येथील ज्या समाज बांधवांना वेबसाईट वरील 'बडगुजर समाज पुस्तिका - औरंगाबाद' मध्ये त्यांची माहिती अपडेट करावयाची असेल त्यांनी कृपया आपली माहिती info@badgujaraurangabad.com या email ID वर ५ ऑगस्ट २०१५, बुधवार पर्यंत पाठवावी. सदर माहिती १५ ऑगस्ट पर्यंत वेबसाईटवर अपडेट करण्यात येईल. धन्यवाद!
 • दि.२०.०७.२०१५ श्री.संजय सोनू बडगुजर औरंगाबाद,यांचा मुलगा चि.जुगल संजय बडगुजर हा १० वी च्या परीक्षेत ९५.८०% गुणांनी उत्तीर्ण झाला. त्याच्या ह्या यशाबद्दल बडगुजर समाज मंडळ औरंगाबाद यांच्या तर्फे हार्दिक अभिनंदन.
  More details
 • दि.२०.०७.२०१५ श्री. सुनील रमेश बडगुजर औरंगाबाद, यांची मुलगी कु.डॉली सुनील बडगुजर हि १० वी च्या परीक्षेत ८९.६०% गुणांनी उत्तीर्ण झाली. ह्या यशाबद्दल बडगुजर समाज मंडळ औरंगाबाद तर्फे हार्दिक अभिनंदन .
  More details
 • बडगुजर समाज मंडळ औरंगाबाद तर्फे SSC च्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!
 • चि. लोहित भगवान बडगुजर यांचे बॉस्टन, अमेरिका येथे आंतराष्ट्रीय वैज्ञानिक परीषदेत यांनी आपले शंशोधन प्रसिध्द केलेत. त्या बद्दल त्यांचे संपूर्ण बडगुजर समजा तर्फे अभिनंदन.
 • शोक संदेश: कळविण्यात अत्यंत दु:ख होते कि सौ. संगीता चंद्रकांत बडगुजर यांच्या मातोश्री व श्री चंद्रकांत किसन बडगुजर राहणार पुणे यांच्या सासूबाई सौ. विमलबाई नारायण बडगुजर यांचे बुधवार दि. ०४/०२/२०१५ रोजी रात्री ११:५० वा. दुखद निधन झाले. दशक्रिया विधी - शुक्रवार दि. १३/०२/२०१५ रोजी तसेच गंधमुक्ती, उत्तरकार्याचा कार्यक्रम- सोमवार दि. १६/०२/२०१५ रोजी सकाळी १०:०० वा. करण्याचे योजिले आहे. बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद येथील सर्व समाज बंधू व भगिनी ह्या दुखात सहभागी असून परमेश्वर सौ. विमलबाई नारायण बडगुजर यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. कळावे.
 • २५ जानेवारीच्या कार्यक्रमाची प्रेस नोट
 • रविवार दिनांक 25 जानेवारी 2015 रोजी सकाळी 10 वाजता बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद तर्फे मौलाना आझाद संशोधन केंद्र, औरंगाबाद येथे औरंगाबाद जिल्हा बडगुजर समाज दर्शिका प्रकाशन व बेव साईट लॉचिंगचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे अद्यक्ष व उद्घाघाटक मा.श्री. सुधाकरभाऊ बडगुजर, नाशिक यांची उपस्थिती असून कार्यक्रमास अखिल भारतिय बडगुजर समाज महासमितीचे सर्व पदाधिकारी तसेच महाराष्ट्, गुजरात व मध्यप्रेदश या राज्यातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या सामाजिक कार्यक्रमास जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित रहावे अशी विनंती बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Career Guidance PPT


Reservation GR